Thursday, October 20, 2011

To mich assel kaa


अडखळशील जेव्हा अंधारात चालतांना,
धरशील जो हात विश्वासाने तू,
तो हात माझाच असेल ना..?

बघतांना आरशात प्रतिबिंब तुझे,
... ... आठवशील जे गोड शब्द तू,
ते शब्द माझेच असतील ना..?

जाणवेल तूला प्रेमाची चाहूल
धुंदीत त्या , जे घेशील श्वास तू,
ते श्वास माझेच असतील ना..?

गाढ झोपेत, बंद डोळ्यांनी
स्वप्नातही शोधशील त्यालाच तू,
‘तो’ मीच असेल ना..?

एकांतात असतांना जेव्हा
आठवशील वेड लावणारी आठवण तू,
ति आठवण माझीच असेल ना..?

शोधशील जीवनात या चालताना
सोबतीला एक वेड हृद्य तू,
ते वेड हृद्य माझच असेल ना..?

No comments:

Post a Comment